Monday, 27 May 2019

इतिहासाच्या पाऊलखुणा

गेली काही वर्षे "राफ्टर पब्लिकेशन" ची इतिहास विषयक पुस्तके म्हणजे ससंदर्भ इतिहासाचा आरसा अशीच ओळख निर्माण झाली आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १,२, पेशवाई, पुरंदरे, झंझावात, रणझुंजार, सदाशिवराव भाऊ, समरधुरंधर ही पुस्तके रसिक इतिहासप्रेमींच्या पसंतीस उतरली आणि आजही उतरत आहेत. यशाची ही चढती वाढती कमान यश, प्रसिद्धी देत असतानाच जवाबदरीचे भानही देऊन जाते. अर्थात पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, शिवभूषण निनादराव बेडेकर, डॉ. सदाशिवराव शिवदे यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने हे भान ओझे न वाटता सुकर सन्मार्ग वाटते. याच सन्मार्गावर आमच्या सोबत काही नवे, अभ्यासू शिलेदार जोडले जात आहेत. या शिलेदारांना घेऊन राफ्टर पब्लिकेशन घेऊन येत आहे .... "इतिहासाच्या पाऊलखुणा भाग -३" श्री सांबसदानंद आणि श्री आदिशक्ती तुळजाभवानीच्या आशीर्वादे करून या नव्या शिलेदारांच्या नव्या प्रकल्पास बाकी सर्व पुस्तकांप्रमाणे यश आणि इतिहासप्रेमींच्या मनात स्थान मिळेलच याची खात्री आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा भाग 3 ची नोंदणी सवलतीच्या दरात प्रकाशनपूर्व आपल्याला खालील दुकानात करता येईल. मॅजेस्टिक ठाणे मॅजेस्टिक डोंबिवली रसिक पुणे तसेच ऑनलाईन बुकिंग साठी खलील लिंकही वापरता येईल https://amzn.to/2Eh3Wra https://amzn.to/2HpgVcm बहुत काय लिहिणे ? आमचे आगत्य असू देणे

No comments:

Post a Comment